सोलापूर : साखरेऐवजी गुळाचा वाढतोय वापर !

बदलत्या जीवनशैलीसाठी सेंद्रिय उत्पादनात गुळाचा समावेश
jaggery
jaggery sakal

सोलापूर : रोजच्या आहारामध्ये साखरेला पर्याय म्हणून गुळाचा व त्यानंतर गूळ पावडरचा उपयोग आता वाढू लागला आहे. गूळ व गूळ पावडरच्या वाढत्या वापराने गुळाच्या बाजारपेठेला मोठी प्रगती साधता येऊ शकेल असे मानले जात आहे. गुळाच्या बाजारात मागील काही कालावधीत वाढ झाली आहे. साखरेला नैसर्गिक पर्याय म्हणून गुळाचा उपयोग इतर सेंद्रिय उत्पादनाप्रमाणे योग्य ठरवला जात आहे. सातत्याने ऑनलाइन बाजारातदेखील ऑरगॅनिक गुळाची विक्री सुरू असते.

सर्वच ऑनलाइन विक्रीसोबत किराणा दुकानामध्येदेखील गुळाची विक्री वाढते आहे. गुळाच्या दर्जा व उत्पादनाच्या संदर्भात बाजारमध्ये निश्‍चित अशी गुणवत्तेची वर्गवारी झालेली नाही. तरीही गुळाचा पर्याय अधिक प्रमाणात स्वीकारला जातो आहे. ज्या गुळाला पॅकिंग व ब्रॅंडिंगचा दर्जा मिळेल त्याची ग्राहकी निश्‍चितच वाढते आहे, असा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे. सातत्याने जे शेतकरी गुऱ्हाळात गुळाचे उत्पादन घेतात, त्यांना आता पुढील काळात पॅकिंग व ब्रॅंडिगवरलक्ष द्यावे लागणार आहे.

निश्‍चितपणे साखरेला गुळाचा पर्याय आहाराच्या दृष्टीने अधिक उजवा आहे. त्यात लोह व मॅग्नेशियमचे प्रमाण असते. तयार साखरेत सल्फर असते जे की आरोग्याला उपयुक्त नसते. खांडसरी, काकवी, मध हे गोड पदार्थाचे पर्याय वापरले पाहिजेत.

- डॉ. सोनाली घोंगडे,आहार तज्ज्ञ, सोलापूर

मी माझ्या घरात बहुतांश विषमुक्त पदार्थांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये आम्ही साखरेला सेंद्रिय गुळाचा पर्याय दिला. मी स्वतः माझा ऊस सेंद्रिय पध्दतीने वाढवून घरीच गूळ तयार करतो. माझ्या कुटुंबात वापरलेल्या या पर्यायाने आरोग्यदायी जीवनशैली तयार झाली आहे. माझे ग्राहकदेखील साखर सोडून गूळ वापरत आहेत. ही संख्या वाढत आहे.

- संदीप पवार, अंकोली, ता. मोहोळ

सेंद्रिय गूळ व गूळ पावडरची उत्पादने वाढली आहेत. तसेच त्याचे ग्राहकदेखील वाढले आहेत. अर्थात इतर उत्पादनांप्रमाणे गुळाचे ब्रॅंडिंग व पॅकिंगला महत्व आले आहे. वर्षभर लागणाऱ्या गुळाची एकत्रित पॅकेज खरेदी केली जात आहेत.

- सिध्दाराम उमदी, गूळ व्यापारी, सोलापूर

मधुमेहाचा आजार असेल तर या रुग्णाला साखरेप्रमाणे गूळदेखील टाळावाच लागणार आहे. मधुमेहाच्या रुग्णाला कोणतेही गोड पदार्थ टाळणेच आवश्‍यक असते.

- डॉ. श्रीकांत पागे, मधुमेहतज्ज्ञ, सोलापूर

गूळ वापराचे बदलते स्वरुप

  • गुळाचा साखरेला पूर्ण पर्याय देण्याचे प्रयत्न

  • बदलत्या जीवनशैलीमध्ये सेंद्रिय उत्पादन म्हणून साखरेऐवजी गुळाला स्थान

  • गुळाऐवजी तयार गूळ पावडरचा वाढता उपयोग

  • गुळाचा चहादेखील बनतोय ब्रॅंड

  • गुळापासून केलेल्या मिठायांची वाढती मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com