

Record-Breaking Achievement: 8-Year-Old Soham Puts Solapur on Global Map With Thailand Win
Sakal
सोलापूर : बालकलाकार सोहम येमूल याची थायलंड येथे २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कठपुतली (कळसुत्री बाहुल्या) महोत्सवासाठी निवड झाली आहे. ‘हार्मनी पपेट फेस्टिव्हल’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सोहम, वडील शाम, आई सोनाली येमूल हे ‘कटपुतलीतून गीत रामायण’ सादर करून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सोहमची ही निवड सोलापूरच्या स्थानिक कलेला जागतिक स्तरावर घेऊन जाणारी ठरली आहे.