
Buddhist Maha Sabha protest in Solapur demanding Dikshabhoomi management rights.
esakal
सोलापूर: दीक्षाभूमी स्मारक बांधकाम समितीने असंवैधानिकरित्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर कब्जा केल्याचा आरोप करत याचे संपूर्ण व्यवस्थापन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर) यांच्याकडे सोपवावे, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी इतरही प्रश्न मांडण्यात आले.