Solapur News: 'कार्तिकीसाठी मराठवाड्याला जादा गाड्या'; आदिलाबाद-पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या

Kartiki Pilgrimage Rush: गाडी क्रमांक ०७६१३/०७६१४ आदिलाबाद-पंढरपूर या विशेष गाडीच्या ४ फेऱ्या आहेत. गाडी क्रमांक ०७६१३ ही गाडी ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत आदिलाबादहून सकाळी ८:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजता पंढरपूरला पोचणार आहे.
Special train flagged off for Kartiki Wari pilgrims from Adilabad to Pandharpur under Solapur division.

Special train flagged off for Kartiki Wari pilgrims from Adilabad to Pandharpur under Solapur division.

Sakal

Updated on

सोलापूर : ‘आषाढी-कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग’ या अभंगाप्रमाणे वारकरी संप्रदायात कार्तिकी एकादशीला आषाढी पाठोपाठ महत्त्व आहे. यासाठी कार्तिकी वारी कालावधीतील वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मिरज-लातूर पाठोपाठ आदिलाबादला शुक्रवार (ता.३१) पासून चार जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त प्रवासी भाविकांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून आदिलाबाद आणि पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com