माढा - सलग ३६ तास कर्तव्यावर राहून भारतीय सैन्य दलाच्या ४१ जवानांनी सीना नदीला आलेल्या महाप्रलयंकारी महापुरात अडकलेल्या माढा तालुक्यातील राहुलनगर येथील २६७ लोकांचे प्राण वाचवले आहेत. .आर्मि एअर डिफेंस (ए.डी.), इंजिनीयर टास्क फोर्स (इ.टी.एफ.), मेडिकल टीम यांचा समावेश असलेल्या या बचाव कार्यासाठी पुणे जिल्ह्यातील देहू येथून भारतीय सैन्य दलाचे जवान २३ सप्टेंबरला सकाळी सातच्या सुमारास निघाले.महापुरामध्ये सर्वाधिक अडचणीत असलेल्या राहुलनगर या ठिकाणी लोकांना पाणी आणि अन्नाची नितांत गरज होती. आणि कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी पोहोचणे इतर बचाव कार्या पथकांनाही कठीण होते..यावेळी माढा तहसील कार्यालयामधे मेजर सोनू यादव, नायब सुभेदार अक्षय कुमार नायक, नायब सुभेदार एस. पी. पाटील, कॅप्टन अर्जून, आमदार अभिजीत पाटील, तहसीलदार संजय भोसले, नायब तहसीलदार विजय कवडे, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रशासन आणि भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी राहुलनगरला मदत पोहोचवण्यासाठी बचाव कार्य हाती घेतले..सलग बारा तासाच्या प्रवासानंतर एक तासांमध्ये बचाव कार्याचे नियोजन करून भारतीय सैन्यदलाची टीम मेजर सोनू यादव यांच्या नेतृत्वाखाली राहूलनगरकडे २३ सप्टेंबरला रात्री अकरा वाजात रवाना झाली.कोसळणारा पाऊस, महापुराचे पाणी, चिखल, राडारोडा, काळाकुट्ट अंधार, निसरडा चिखलमय रस्ता अशा प्रतिकूल परिस्थितीत सहा तासांचा प्रवास करून भारतीय सैन्य दलाचे जवान राहुलनगर या ठिकाणी २४ सप्टेंबरला पहाटे पाच वाजता पोहोचले. अत्यंत गरज असलेले पाणी आणि फळे तेथील नागरिकांना पोहोच केली..तेथूनच या ग्रामस्थांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पहाटे पाच पासून २४ सप्टेंबरच्या सायंकाळी सहापर्यंत भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी महापुराच्या पाण्यातून १८ फेऱ्या करत ११३ महिला, १०९ पुरुष, ४५ लहान मुले असे २६७ ग्रामस्थांचे प्राण वाचवले.काही तरुण युवक जनावरांच्या चारापाण्यासाठी राहुलनगर येथील राहण्याचे पसंद केले. त्यांच्यासाठी पुन्हा जवानांनी दोन फेऱ्या करून पाणी व खाद्यपदार्थ पुरवले. सलग ३६ तासाचे बचाव कार्य या जवानांनी केले. त्यांच्यासोबत दोन अधिकारी, चार सरदार, ३५ जवान अशा ४१ सैन्यांचा यात समावेश होता. दोन ट्रक, दोन बोटी, एक ॲम्बुलन्सचा समावेश होता..महसूल प्रशासनाचे तलाठी परशुराम जगदाळे यांच्याबरोबर माढयातील नृसिंहगणेश मंडळ आणि शिवरंग गोटे, सौरभ पिलीवकर, दादा फडतरे, स्वप्नील खडके, राज चवरे, प्रितीश कथले, स्वानंद शहाणे, कौस्तुभ जोशी यांनी जवानांना सोयिसुविधा दिल्या.१२६ एलटीएडी रेजिमेंटच्या आर्मि एअर डिफेंस (ए.डी.), इंजिनीयर टास्क फोर्स ( इ.टी.एफ.), मेडिकल टीममधील जवानांनी हे बचाव कार्य मेजर सोनू यादव, नायब सुभेदार अक्षय कुमार नायक, नायब सुभेदार एस. पी. पाटील, कॅप्टन अर्जून यांच्या मार्गदर्शनाखाली व सहभागाने पूर्ण केले..राहुलनगर आणि जवानांचे नातंराहुलनगरचे जुने नाव सुलतानपूर होते. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात या सुलतानपूरचा जवान शहीद राहुल शिंदे हा शहीद झाला. त्यामुळे सुलतानपूरचे नाव राहुलनगर असे केले. त्याच राहुलनगरमधे पुराच्या पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना वाचविण्यासाठी पुन्हा जवानच धावून आले हा एक योगायोगच आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.