Solapur | जुळे सोलापूरवर महापालिकेडून होतोय अन्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Injustice is being done by Solapur Municipal Corporation

सोलापूर : जुळे सोलापूरवर महापालिकेडून होतोय अन्याय

सोलापूर : महापालिकेला कर स्वरूपात सर्वाधिक महसूल जुळे सोलापूरमधून मिळतो. तसेच १०२ नगरसेवकांपैकी ७० नगरसेवक हद्दवाढ आणि जुळे सोलापूर भागातून निवडून येतात. मात्र, महापालिकेकडून मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात अन्याय होतो, असा आरोप येथील नागरिकांमधून होत आहे. येथील रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याच्या तीव्र भावना नेहरू नगर शासकीय मैदानावर जुळे सोलापूर हद्दवाढ भाग कृती समितीने आयोजित केलेल्या नागरी संवादात उमटल्या.

हेही वाचा: कोरोनाबाधितांवर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच उपचारासाठी दक्षता घेतली : डॉ. काळे

मुंबई आणि उपनगरात एकुण सहा महापालिका अस्तित्वात येण्यासाठी तेथील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. पुण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका अस्तित्वात येण्यासाठी तेथील नागरिक आणि इंडस्ट्री असोसिएशनने पुढाकार घेऊन महापालिका अस्तित्वात आणली. जुळे सोलापूर महापालिका अस्तित्वात येण्यासाठी सर्वस्तरातून व्यापक प्रयत्न, अभ्यासपूर्ण मांडणी आणि नगरविकास खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यास जुळे सोलापूर महापालिका निर्माण होऊ शकेल, असा विश्वास गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केला. या नागरी संवादात राहुल मांजरे, आनंद पाटील, युसुफ पिरजादे, संदीप साळुंखे, आनंद हुलगेरी, प्रसाद गोटे, कलबुर्गी, सुजित कोरे, संदीप फुलारी, विजय इंडीकर, दत्ता म्हेत्रे, प्रवीण राऊत, रा.ज. कांबळे, भरत धनशेट्टी आदींसह नागरिक सहभागी होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Solapur
loading image
go to top