
Ratanbai Deshmukh delivering a stern message to Shekap workers in a viral video clip.
Sakal
सांगोला : शेतकरी कामगार पक्षातील अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्या धर्मपत्नी रतनबाई देशमुख आता बंडखोरांचा समाचार घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. आमचे नाव किंवा फोटो वापराल तर खबरदार, असा इशाराच त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षातील बंडखोर नेत्यांना दिला आहे. या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.