
पंढरपूर : मागील दहा वर्षात (२००९ ते २०२४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट कोणी लावली, असा सवाल उपस्थित करत, माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीमध्ये अनेकजण कापाकापी करण्यासाठी हातात कात्री घेऊन बसले होते. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुरती वाट लागली, अशी टीकाही त्यांनी केली.