

Lured by High Returns, Solapur Victim Loses ₹72 Lakh; Accused Held in Delhi
sakal
सोलापूर : शहरातील एकाला क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास १० ते ३०० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ७२ लाख ६४ हजार रुपयाला गंडा घातला होता. या गुन्ह्यातील संशयित आंतरराष्ट्रीय आरोपी मूख्य सूत्रधार रोज मगर थापा (वय २३, रा. बोसन, काटमांडू, नेपाळ) याला दिल्लीच्या विमानतळावरून पोलिसांनी अटक केली आहे.