

Aquarium Escape Turns Risky: Helicopter Fish Invade Ujani Waters
sakal
-राजाराम माने
केत्तूर : दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी परिसरातील सकरमाउथ अर्थात ‘हेलिकॉप्टर’ मासा आता उजनी धरणासह भीमा नदीलगतच्या जलस्रोतांमध्ये वेगाने वाढू लागला आहे. तो स्थानिक मत्स्यसंपदा आणि पर्यावरणासाठी मोठे संकट बनला आहे. फिश टँकमधून जलाशयात सोडण्यात आलेल्या या परदेशी प्रजातीने आता उजनीत बाळसे धरले आहे.