नवीन वाहन परवान्यासाठी एमबीबीएस डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक

Driving-Licenses
Driving-Licenses
Summary

परिवहन आयुक्‍त अविनाश ढाकणे यांची माहिती

सोलापूर: प्रत्येक व्यक्‍तींला आणि विशेषतः चाळीस वर्षापुढील व्यक्‍तींना नवीन वाहन परवाना काढण्यासाठी आता एमबीबीएस डॉक्‍टरांचे ऑनलाईन प्रमाणपत्र असणे आवश्‍यक असल्याची माहिती परिवहन आयुक्‍त अविनाश ढाकणे यांनी सांगितले. ते शनिवारी सोलापूर दौ-यांवर आले असता शासकीय विश्रामगृह येथील आयोजित बैठकीत बोलत होते.

Driving-Licenses
सोलापूर जिल्ह्यातील 'या' दोन गावातील शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज

वाहन परवाना काढण्यासाठी आता एमबीबीएस डॉक्‍टरांना आरटीओ कार्यालयाकडून यूडीआय नंबर दिला जाईल व तो डॉक्‍टर दिवसांतून केवळ 20 वाहनधारकांना प्रमाणपत्र देता येणार असल्याची सोय केली असल्याचे आयुक्‍त ढाकणे यांनी सांगितले. आरटीओ कार्यालयातील सर्व सेवा ऑनलाईन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे उपस्थित होते. वाहनधारकांनी दंडाची आणि वाहन नोंदणीची रक्‍कम देखील ऑनलाईन भरता येणार आहे.

Driving-Licenses
सावधान! सोलापूर जिल्हा बनतोय बिबट्यांचा अधिवास; जाणून घ्या कारणे

ज्यावेळी आपण नवीन वाहन खरेदी करतो तेंव्हा दिलेला मोबाईल क्रमांक सुरु आहे किंवा नाही हे प्रत्येक वाहनधारकांनी तपासणे आवश्‍यक आहे. अन्यथा दंडाच्या रकमेचा भुर्दंड वाहनधारकांना बसणार असल्याचे ढाकणे यांनी यावेळी सांगितले. वाहन खरेदी करतेवेळी आपण दिलेल्या मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्‍यक आहे. कारण कारवाईचे संदेश मोबाईलवर येणार आहेत. एखाद्या वाहनधारकांने सिग्नल तोडल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून त्यांच्या नंबर प्लेटचा फोटो काढला जातो आणि ऑनलाईन पध्दतीने कारवाई केली जाते.

Driving-Licenses
तुम्हाला लगेच नोकरी हवीय का? सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस

मात्र अनेकदा मोबाईल क्रमांक बदलला असल्याने दंडाच्या रकमेकवर विलंबाचा शुल्क वाढत जातो. त्यामुळे दंडाच्या रकमेचा भुर्दंड वाहनधारकांना बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून आता वाहन खरेदीवेळेला नोंदणी केलेला मोबाईल नंतर बंद असेल तर तुमचा चालू मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची सोय केली आहे. घरबसल्या तुम्हांला चालू मोबाईल नंतर अपडेट करता येणार आहे. भविष्यात ही समस्या जाणवू नये, यासाठी वाहन नोंदणी करताना आधार कार्ड, पॅन कर्ड सक्‍तीचे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com