

Former MLA Dilip Mane says empowering party workers is his foremost responsibility amid rising speculation over his possible BJP entry.
Sakal
-विठ्ठल सुतार
सोलापूर: भाजप प्रवेशाबाबत मी प्रदेश पातळीवर एकाही नेत्याशी पुन्हा संपर्क केला नाही. पण, मतदार संघातील अनेक कार्यकर्ते कोणतीही सत्ता वा पद नसताना मागील १० वर्षापासून सोबत आहेत. मला त्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यांना ताकद देणे माझे कर्तव्यच आहे. शहरासह मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना व विचार ऐकून घेत पुढील काळात आपण परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहे, अशी भूमिका माजी आमदार दिलीप माने यांनी मांडली. भाजपातील लांबणीवर पडलेला प्रवेश, कार्यकर्त्यांच्या भावना आणि पुढील वाटचालीबाबत सकाळ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला.