

Jain community members submit a memorandum to the Solapur District Collector demanding cancellation of the land sale deed of Jain Boarding.
Sakal
सोलापूर : सकल जैन समाजाला अंधारात ठेवून महाराष्ट्र शासनासह धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करून पुणे येथील हिराचंद नेमचंद दिगंबर जैन वसतिगृहाची साडेतीन एकर जागा विश्वस्त मंडळाने विकासकाला विकली आहे. त्यामुळे जैन समाज आक्रोशित झाला आहे. लबाडीने झालेले जागा विक्रीचे खरेदीखत रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन सोलापुरातील सकल जैन समाजातर्फे उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना सोमवारी दुपारी देण्यात आले.