
सोलापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एमआयएम पराभूत झाली परंतु संपली नाही. आजही जनतेच्या मनात एमआयएम बद्दल प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, अच्छे दिन येणार आहेत. त्यांना अच्छे दिन आले की नाही, माहिती नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमला अच्छे दिन नक्कीच येतील, असा विश्वास माजी खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी व्यक्त केला.