Janata curfew : बसस्थानकावर एकही बस नाही

Janata curfew in Madhe taluka
Janata curfew in Madhe taluka

माढा (सोलापूर) : माढा शहरासह तालुक्यात कोरोना व्हायरस संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.  माढा शहरामध्ये सकाळपासूनच जनता कर्फ्यूमुळे लोक रस्त्यावर आलेले दिसून आले नाहीत. माढा बस स्थानक पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र दिसून येत होते. 
माढा बसस्थानकावर सकाळपासून प्रवासी आढळून आले नाहीत. बस स्थानकावर बसही उभ्या नव्हत्या. शहरातील गजबजलेला मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातही लोकांची वर्दळ व वाहनांची वर्दळही जनता कर्फ्यूमुळे आढळून आली नाही. शहरातील दवाखाने व मेडिकल स्टोअर या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने, कार्यालये, आस्थापने कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. भाजी मंडई व किराणा दुकानेही बंद ठेवत जनता कर्फ्यूला प्रतिसाद देताना दिसून आले. शहरातील इंदिरा गांधी चौक, तांबे चौक, टिळक चौक, पोलीस स्टेशन चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, बाजार पटांगण, विस्तारित भाग, तहसील कार्यालय परिसर, कोर्ट परिसर या सर्वच भागांमध्ये जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले. माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद देत नागरिकांनी रस्त्यावर येण्याचे टाळल्याचे चित्रही दिसून येत होते. तालुक्यातील कुर्डूवाडी, टेंभुर्णी, मोडनिंब, माढा या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. एकंदरीतच माढा तालुक्यामध्ये जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com