
सोलापूर : सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर ऑगस्टमध्ये सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ऑगस्टमध्ये मुंबईची विमानसेवा सुरू होईल, असे आम्ही जाहीर केले होते. आता ऑगस्ट सुरू झाला आहे, आणखी एक महिना शिल्लक आहे. ऑगस्टमध्ये सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होईल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात व्यक्त केला.