
सोलापूर : होटगी रोड विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज झाले आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू व्हावी यासाठी मी स्वत: पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर सोलापूरकरांना गोड बातमी समजेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज व्यक्त केला. सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर नियोजन भवन येथील बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.