Minister Jayakumar Gore: शरद पवारांनी पूर्वीच मराठा आरक्षणावर विचार करायला हवा होता: पालकमंत्री जयकुमार गोरे; मुंबईत आंदोलनाची वेळच आली नसती
Minister Jaykumar Gore Targets Sharad Pawar: आजही अनेक मराठा समाज बांधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतात. परंतु काही लोकांना ते पटत नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून २३७ जागा निवडून आल्या आहेत.
पंढरपूर: राज्यातील आरक्षण प्रश्नांवर ज्येष्ठनेते शरद पवार यांचा खूप अभ्यास आहे. ते सत्तेत असताना मराठा आरक्षणावर अभ्यास केला असता, तर आज मराठा समाज बांधवांवर मुंबईत आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असा उपरोधिक टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला.