Tembhurni Crime: 'दरवाजा तोडून मारहाण; पळवले दागिने', टेंभुर्णी शहरात घटना; एक जखमी, दीड लाखाचा ऐवज लंपास

Violent Robbery in Tembhurni: शनिवारी मध्यरात्री पावणे एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान ही जबरी चोरीची घटना घडली. नबी रसूल मौला शेख शनिवारी रात्री जेवण करून पत्र्याच्या घरात झोपले होते. रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घराच्या दरवाजावर दगड मारल्याचा आवाज आला.
Police inspecting the Tembhurni house where thieves broke the door, assaulted a resident, and looted jewellery.

Police inspecting the Tembhurni house where thieves broke the door, assaulted a resident, and looted jewellery.

Sakal

Updated on

टेंभुर्णी : टेंभुर्णी अकलूज रस्त्यावरील श्री संत सावतामाळी मंगल कार्यालयासमोरील घराच्या दरवाजावर दगड मारत दरवाजा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. एकास लोखंडी टॉमी, दगडाने मारहाण करून जखमी केले व दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व कानातील टॉप्स असा एक लाख ४६ हजार दोनशे रूपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत नबी रसूल मौला शेख (वय ५२ रा. टेंभुर्णी) हे जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com