सोलापूर : रिक्षातील मीटरचा केवळ दिखावाच ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा
सोलापूर : रिक्षातील मीटरचा केवळ दिखावाच !

सोलापूर : रिक्षातील मीटरचा केवळ दिखावाच !

सोलापूर : शहरातील सर्व रिक्षांना (autorickshaw)रितसर व योग्य भाडे (Fair)आकारणीसाठी मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र ते केवळ नावापुरतेच असून, मीटरने ना कोणताही प्रवासी भाडे देतो, ना रिक्षाचालक मीटर चालू करतात. जवळपास सर्वच मार्गावर किमीप्रमाणे रिक्षाचालक भाडे आकारतात. यातून ग्राहकांची आर्थिक लूट होताना दिसून येत आहे.

हेही वाचा: सोलापूर : शासनाने बाळंतपणासाठी दाखवली सरकारी रुग्णालयांची वाट

शहरात १५ हजार ८१६ रिक्षा असल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दप्तरी करण्यात आली आहे. रिक्षा (autorickshaw)पासिंगच्यावेळी प्रत्येक वाहनाला मीटर असतेच. त्याशिवाय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षांचे पासिंग केले जात नाही. परंतु, शहरातील जवळपास सर्वच रिक्षांमधील मीटर आज केवळ शोभेची वस्तू बनल्याचे वास्तव आहे. रिक्षाने कोणत्याही भागात प्रवास करायचा असल्यास प्रतिव्यक्तीने दर ठरविण्यात येतात. सोलापूर शहरात कोणत्याही मार्गाने रिक्षाने प्रवास करायचा झाल्यास प्रवासी मीटरने भाडे देत नाहीत व रिक्षाचालक मीटरचे भाडे घेत नसल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले.अंतरानुसार वसूल केले जाते भाडे.(Solapur news)

हेही वाचा: सोलापूर : सरकारी शाळेत गुणवत्तेसाठी येणार ‘व्हिजन-२०२२’

शहरात प्रत्येक रिक्षाला मीटर बसविण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार रिक्षाचे भाडे हे मीटरनुसार आकारले पाहिजे असे बंधनकारक आहे. मात्र सोलापूरमधील नागरिकांना रिक्षाला मीटर असते हे माहीत असूनदेखील त्याच्या प्रत्यक्षातील वापरासाठी कोणीही सरसावत नाही. रिक्षातील मीटर हे ‘असून अडचण नसून खोळंबा’ असेच आहेत. शहरातील वेगळ्या ठिकाणानुसार रिक्षाचालक प्रवाशांना भाडे हे अंतरानुसार किंवा प्रतिव्यक्ती याप्रमाणे आकरत असतात. शहर असो वा ग्रामीण भाग रिक्षाने प्रवास करायचा असल्यास अंतरानुसार रिक्षाचे भाडे ठरविण्यात येते.

हेही वाचा: सोलापूर : कोरोनात पोटभर अन्नासाठी सर्वसामान्यांचा संघर्ष!

शहरात कोणत्याही भागात जायचे झाल्यास रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करण्यात येते. शहरातील रिक्षांमध्ये जणू मीटरचा काही संबंधच येत नाही. रिक्षाचालक हे आपापल्या पद्धतीने भाडे आकरतात.

- सागर कुचेकर, प्रवासी

रिक्षांमध्ये मीटर सुरू करुन त्यानुसार भाडे आकारणीची मागणी आहे. दरवाढीसंदर्भात आरटीओ कार्यालयास पत्रव्यवहार सुरु आहे. नागरिकांनी मागणी केल्यास रिक्षाचालक त्वरित मीटर सुरु करतील.

- महिपती पवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल, सोलापूर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurRickshaw
loading image
go to top