सोलापूर : सरकारी शाळेत गुणवत्तेसाठी येणार ‘व्हिजन-२०२२’

झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांचे नियोजन; पशुधनासाठी राबविणार विविध योजना
zp ceo dilip swami
zp ceo dilip swamiesakal

सोलापूर : स्वच्छ शाळा(clean schools), सुंदर शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांचा परिसर सजला. शाळा सजल्या, विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी महत्वाची असलेली शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा परिषद शाळेत आणण्यासाठी मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी(zp ceo dilip swami) ‘व्हिजन-२०२२’ सध्या हाती घेतले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या(jilha parishad solapur) शाळेत या व्हिजनची अंमलबजावणी केली जाणार आहे.

zp ceo dilip swami
"पाम वाइन' नव्हे, जीवघेणी कृत्रिम ताडीच; दुकानांचे परवाने रद्द करा!

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतून सीईओ स्वामी यांनी शिक्षकांची बौद्धिक पातळी पडताळली आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आगोदर शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसोबत उभा राहिला पाहिजे यासाठी ‘व्हिजन-२०२२’ उपयुक्त असणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षणात इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीचा अधिकाधिक वापर करण्यावर सीईओ स्वामी यांनी भर दिला आहे.

zp ceo dilip swami
सांगोल्याच्या 'डाळिंब कोठारा'लाच लागली कीड!

सोलापूर जिल्ह्यात पंढरपुरी म्हैस, खिलार असे अनेक जातीवंत पशुधन आहे. या पशुधनाचे संवर्धन होत नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या पशुवैद्यकीय संस्था मोडकळीस आल्या आहेत. मनुष्यबळाचा व साधन सामुग्रीचा तुटवडा आहे. २०२२ मध्ये पशुसंवर्धन विभागाला अत्याधुनिक करण्यासाठी, जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी सीईओ स्वामी सध्या नवीन योजना आखत आहेत. नव्या वर्षात शिक्षण, आरोग्य, पशुधन याला अधिक प्राधान्य असणार आहे.

  1. संकल्प २०२२ चा

  2. जनावरांच्या दवाखान्यांचे होणार बळकटीकरण दूध उत्पादन वाढविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य केंद्रांसाठी जनसंजीवनी अभियान प्राथमिक शिक्षणात आयटीचा अधिकाधिक उपायोग शिक्षकांच्या ज्ञान अद्ययावत करण्यावर विशेष भर

zp ceo dilip swami
बार्शीचे कलिंगड पश्‍चिम बंगालच्या बाजारपेठेत!

कोरोनाची तिसरी लाट, ओमिक्रॉनला रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन युद्ध पातळीवर नियोजन करत आहे. जिल्ह्यात ओमिक्रॉनचा कमीत कमी प्रादुर्भाव व्हावा यासाठी सध्या सुक्ष्म नियोजन सुरु आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे बळकटीकरण, सेवांमध्ये वाढ करण्यासाठी अभियान सुरु केले आहे.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com