
अक्कलकोट: मुंबईहून अक्कलकोट येथे दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतील रोख रकमेसह सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने बॅगेतून लंपास केले. ही घटना आज (ता. २०) रोजी सकाळी दहा वाजता घडली. याबाबत रजनी दामोदर आव्हाड (वय ७०, रा.मुलुंड, मुंबई) यांनी रोख साडे सहा हजार रुपये व साठ हजार किमतीने दागिने चोरल्याची फिर्यादी दिली. अक्कलकोट उत्तर ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.