

Four Solapur cyclists celebrate after completing the 4200 km K2K ride from Kashmir to Kanyakumari.
Sakal
सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत आव्हानात्मक ‘के२के’ (काश्मीर ते कन्याकुमारी) सायकलिंग इव्हेंटमध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार सायकलस्वारांनी विक्रमी कामगिरी केली आहे. शंकर चव्हाण, सचिन बंडगर, मनोज चोपडे आणि अमृत खेडकर या धाडसी सायकलस्वार संघाने केवळ १६ दिवसांमध्ये तब्बल ४२५० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून यशस्वीरित्या पूर्ण केला.