

Kaikadi Samaj representatives submitting a memorandum to the Resident Deputy Collector demanding ST category inclusion and social justice.
Sakal
सोलापूर: राज्यातील कैकाडी समाज तीन वेगवेगळ्या मागासवर्गीय प्रवर्गांत समाविष्ट आहे. विदर्भातील कैकाडी समाज हा अनुसूचित जातीमध्ये तर उर्वरित राज्यात हा समाज विमुक्त जातीमध्ये समावेश केला आहे. हाच समाज केंद्र शासनाच्या मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसीमध्ये समाविष्ट आहे. तीन वेगवेगळ्या प्रवर्गांत टाकल्याने कैकाडी समाजाला कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.