
सोलापूर : पंढरपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्यात काही मिनिटे संवाद झाला. या भेटीची सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.