खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने जेऊर, केम व माढा येथे रेल्वे गाड्यांना थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mp ranjitsinh naik nimbalkar and ganesh chivate

मध्य रेल्वेच्या जेऊर, केम व माढा या रेल्वेस्थानकावर आणखी तीन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आले आहेत.

Karmala News : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने जेऊर, केम व माढा येथे रेल्वे गाड्यांना थांबा

करमाळा - मध्य रेल्वेच्या जेऊर, केम व माढा या रेल्वेस्थानकावर आणखी तीन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आले आहेत. जेऊर रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेसला, केम स्थानकावर कन्याकुमारी एक्सप्रेसला, तर माढा या रेल्वे स्थानकावर दादर -सोलापूर- सिद्धेश्वर एक्सप्रेस या थांबा मिळाला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हे थांबे मिळाले असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहीती देताना गणेश चिवटे यांनी सांगितले की, तालुक्यातील केम व जेऊर येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांची अनेक दिवसांपासून होती. या मागणीसाठी प्रवाशांचे आंदोलनेही झाली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा पाठपुरावा केल्याने या रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे. याशिवाय माढा रेल्वे स्थानकावर एका एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाला आहे.

जेऊर रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेसला, केम स्थानकावर कन्याकुमारी एक्सप्रेसला, तर माढा या रेल्वे स्थानकावर दादर -सोलापूर- सिद्धेश्वर एक्सप्रेस या थांबा मिळाला आहे.

याशिवाय मागील आठवडय़ात केत्तुर तेथे एका तरी रेल्वेगाडीला थांबा मिळावा म्हणून अंदोलन करण्यात आले आहेत. तालुक्यातील जेऊर व केम येथे महत्वाच्या दोन गाड्यांना थांबा मिळाल्याने भविष्यात केत्तुर येथेही थांबा मिळेल अशी आशा वाटत आहे.

टॅग्स :railwaykarmalamadha