करमाळा : निवृत्तीनाथांच्‍या पालखीचे जिल्ह्यात आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashadi wari 2022

करमाळा : निवृत्तीनाथांच्‍या पालखीचे जिल्ह्यात आगमन

करमाळा : श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी (ता.२) सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. रावगाव (ता. करमाळा) येथे अहमदनगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात या पालखीचे आगमन झाले, यावेळी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार समीर माने यांनी पालखीचे स्वागत केले. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते.

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथून श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला जात आहे. यावेळी श्रींच्या पादुका पूजन तहसीलदार माने, पोलिस निरीक्षक कोकणे व गटविकास अधिकारी राऊत यांच्या हस्ते झाले.यावेळी पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, महावितरणचे अभियंता सुमित जाधव उपस्थित होते.

दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळा झाला नव्हता. या वर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने निघाला आहे. पालखी सोहळ्यात २५ हजार वारकरी आहेत. त्यांच्यासोबत ४५ दिंड्या आहेत. तोफांच्या सलामीत पालखीचे रावगावच्या वेशीवर आगमन होताच सरपंच दादासाहेब जाधव, ग्रामविकास अधिकारी रामदास हजारे यांनी पादुका पूजन व संस्थान अध्यक्ष हभप भाऊसाहेब महाराज गंभीरे, पालखी चालक हभप मोहन महाराज बेलापूरकर, पुजारी हभप जयंत महाराज गोसावी यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. महावितरणचे अभियंता सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे एक पथक गावात सक्रिय आहे. वीज अखंडपणे सुरु राहावी यासाठी पथक परिश्रम घेत आहे. करमाळा पोलिस स्टेशनच्‍या वतीने शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील याविषयी दक्षता घेतली.

Web Title: Karmala Nivruttinath Palanquin In Solapur District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..