करमाळ्याचा धावपटू बंडू वाघमोडेचा हरियाणामध्ये स्पर्धेदरम्यान मृत्यू!

पहिल्याच दिवशीच बंडू वाघमोडे धावण्याच्या स्पर्धेत धावत असताना तो कोसळला व त्याचा मृत्यू झाला.
Bandu Waghmode
Bandu WaghmodeSakal

करमाळा (सोलापूर) - करमाळा श्री कमलादेवी स्पोर्टस्‌ क्‍लबच्या वतीने हरियाणा येथे धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी बंडू दत्तात्रय वाघमोडे (वय 21) याचे महक (जि. रोहतक, हरियाना) येथे ता. 19 धावण्याच्या स्पर्धेदरम्यान आकस्मात निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह करमाळा येथे आणण्यात येणार असून (ता. 21) दुपारी तीन वाजता पार्थिव घेऊन रुग्णवाहिका निघाली आहे. ही घटना समजल्यानंतर प्रशिक्षक दिनेश जाधव तसेच बंडू वाघमोडेचे बंधू नामदेव वाघमोडे व अशोक वाघमोडे हे हरियाना येथे गेले होते.

वाघमोडे परिवार मुळचा निलज येथील रहिवाशी आहेत. ते अलिकडे सुपनवर वस्तीवरती राहत आहेत. दत्तात्रय वाघमोडे हे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांना बंडू व नामदेव अशी दोन मुले व दोन मुली आहेत. नामदेव हा जेसीबी ऑपरेटर असून बंडू हा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात व्दित्तीय वर्षाला आहे. येथील दिनेश जाधव यांच्या श्री कमलादेवी स्पोर्टस्‌ क्‍लबमध्ये बंडू वाघमोडे सराव करत होता. बंडू यास पोलीस खात्यात जाण्याची इच्छा होती व तो त्याची तयारी करत होता. हरियाना येथील महक (जि.रोहतक) येथे 19 सप्टेंबर पासून आंतरराज्य स्पर्धा सुरू झाल्या आहेत.

Bandu Waghmode
Solpaur : बार्शीतील रस्त्यांबाबत उच्च न्यायालयात याचिका !

करमाळा तालुक्‍यातून दहा युवक या स्पर्धेला गेलेले आहेत. त्यापैंकी पहिल्याच दिवशीच बंडू वाघमोडे धावण्याच्या स्पर्धेत धावत असताना तो कोसळला व त्याचा मृत्यू झाला. ही हकीकत घरी समजल्यानंतर वाघमोडे परिवारात मोठा आक्रोश सुरू झाला आहे. सुपनवर वस्ती येथे शोककळा पसरली असून सर्वच परिवारातून दुःख व्यक्त केले जात आहे. एक पैलवान व धावपटू म्हणून नावारूपास येऊ लागलेला बंडू आकस्मात गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. बंडू वाघमोडे यांचा भाऊ नामदेव वाघमोडे, अशोक वाघमोडे, पोथऱ्याचे शिंदे व अकॅडमीचे संचालक दिनेश जाधव हे हरियाना येथे गेले. शवचिकित्सा झाल्यानंतर व सर्व कायदेशीर प्रक्रिया संपल्यावर आज (ता.21) बंडूचे पार्थिव घेऊन करमाळ्याकडे निघाले आहेत. बुधवार ता. 22 रोजी सायंकाळपर्यंत करमाळ्यात येण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com