सोलापूर: केळी निर्यातीचे हब बनलेल्या सोलापूर जिल्ह्यास अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे केळीवर काळे ठिपके पडण्यासह करप्याचा फटका बसला आहे. त्यामुळे निर्यातीमध्ये ३० टक्के घट झाली आहे. अजूनही परिस्थिती सावरली गेली नाही तर ही घट निम्म्यापर्यंत खाली येईल असा अंदाज आहे.