Pandharpur News: ना फडणवीस, ना अजित पवार, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही, मंदिर समितीच्या बैठकीत ठरला निर्णय

यंदाची कार्तिकी महापूजा कोणाच्या हस्ते करायची या संदर्भात मंदिर समितीची बैठक पार पडली
Pandharpur News
Pandharpur NewsEsakal

कार्तिकी सोहळ्याच्या तयारी संदर्भात आज मंदिर समितीची बैठक पार पडली. यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हा पेच मंदिर समिती समोर निर्माण झाला होता. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित द्यावे की अजित पवार यांना हा पेच समितीसमोर निर्माण झाला. दरम्यान आज यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समिती यावर्षी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही. मराठा समाजाच्या भावना सरकारला कळवण्यात येणार आहेत.' गहिणीनाथ महाराज औसेकरांसह विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षांची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

Pandharpur News
Uday Samant : शिक्षकांची दिवाळी होणार गोड! शासनाने केली 6 कोटी 93 लाखांची तरतूद; मानधनाचा सुटला प्रश्न

'आज सर्व मराठा समाज निवेदन देऊन गेला, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत आम्ही कोणत्याही मंत्र्याला व पुढाऱ्याला पंढरपुरमध्ये आम्ही येऊ देणार नाही. आम्ही ही गोष्ट राज्य शासनाच्या कानावर आणि विधी व न्याय विभागाच्या कानावर तो निर्णय घालू', असंही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर म्हटलं आहे.

Pandharpur News
Mula Dam:'मुळा धरणातून पाणी जाऊ देणार नाही नाहीतर..'; आमदार तनपुरेंचा तीव्र इशारा

राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत आज चर्चा झाली. दरम्यान राज्यभरात सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. पंढरपुरातही आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Pandharpur News
Pune News: अजित पवारांच्या खुर्चीत त्यांचाच विश्वासू, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नवी निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com