

Pandharpur Kartik Ekadashi
eSakal
-भारत नागणे
पंढरपूर : रविवारी (ता.2) कार्तिक एकादशीचा सोहळा मोठ्या भावाने पार पडला. मात्र कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या संख्येवरून मत मतांतरे असल्याचे समोर आली आहे. यावर्षी अतिवृष्टी व. महापूर या संकटामुळे भाविकांची कमी असल्याचे स्थानिक दुकानदार व व्यापारी सांगत असले तरी पोलिसांनी मात्र 13 ते 14 लाख भाविक आल्याचा दावा केला आहे. पोलिसांचा दावा खरी की अनेक वर्षांपासून वारीची गर्दी अनुभवनार्या व्यापाच्या अंदाज खरा याची चर्चा पंढरपुरात सुरू झाली आहे. सरकारी पातळीवरून गर्दीचे आकडे फुगवून सांगितले जात असल्याचा आरोप ही काही स्थानिकांनी केला आहे.