

Kartiki Ekadashi Yatra in Pandharpur Faces Water Scarcity Challenge With Arrangements Needed for 10 Lakh Pilgrims
sakal
पंढरपूर : यंदाच्या कार्तिकी यात्रेवर दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता असून, दहा लाख वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांना पिण्याच्या पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पाटबंधारे व नगरपालिका विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.