

Marwari couples observing Karva Chauth fast together, with husbands fasting alongside wives for their long life and well-being.
Sakal
सोलापूर: पत्नीने उपवासाचे व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाला साकडे घालण्याचा सण म्हणजे मारवाडी समाजाचा करवा चौथ सण. सोलापुरातील २ हजार मारवाडी कुटुंबातील जवळपास ४ हजारहून अधिक मारवाडी महिलांनी शुक्रवारी मोठ्या भक्तिभावे हा सण साजरा केला. यंदा केवळ पत्नीनेच नाही तर पतीनीही अर्धांगिनीसाठी उपवास करत या सणाला पारंपरिकतेसोबत आधुनिकतेची जोड देत हा सण साजरा केला.