Solapur Crime: बार्शी रोडवरुन एकाचे अपहरण;'साेलापूर जिल्ह्यात उडाली खळबळ, तपासात भलतच कारण आलं समाेर..

Solapur Barshi Road kidnapping investigation : जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादामुळे अपहरण; बार्शी रोडवरील घटनेने सोलापूरात खळबळ
Solapur Crime

Solapur Crime

Sakal
Updated on

सोलापूर : जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करून पैसे परत दे म्हणत धाराशिवमधील कोंडीराम गंगाराम कांबळे, राजाराम वाघमारे, शामल वाघमारे व अन्य दोघांनी विश्वनाथ स्वामी यांचे अपहरण केले. बार्शी रोडवरील हातला देवी डोंगर येथे नेऊन शिवीगाळ, मारहाण करून दुखापत केली. जिवे ठार मारण्याची धमकीही दिल्याची फिर्याद वीरप्रसाद विश्वनाथ स्वामी (रा. कन्नी नगर, दहिटणे, सोलापूर) याने जोडभावी पेठ पोलिसांत दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com