किसान क्रेडिट कार्डची सुविधा वाढवावी - अमरसिंह माने देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक
जिल्हा बॅंकेने किसान क्रेडिट कार्डची सुविधा वाढवावी : अमरसिंह माने देशमुख

किसान क्रेडिट कार्डची सुविधा वाढवावी - अमरसिंह माने देशमुख

वेळापूर : राष्ट्रीयकृत बॅंकांप्रमाणे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने किसान क्रेडिट कार्डची सुविधा वाढवावी अशी मागणी वेळापूर विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी केली.

हेही वाचा: जळगाव : खासगी, स्कूल बससह सातशेवर वाहने उपलब्ध

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे बॅंक इन्स्पेक्‍टर शशिकांत चंदनशिवे यांची बदली झाल्याबद्दल व नूतन बॅंक इंस्पेक्‍टर रामचंद्र पवार यांची वेळापूर शाखेत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. वेळापूर शाखेस संलग्न सर्व संस्थेच्या वतीने वेळापूर संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांचे हस्ते निरोप तर नूतन बॅंक इंस्पेक्‍टर पवार यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

इतर राष्ट्रीयकृत बॅंकांच्या एटीएम कार्डवरुन कधीही पैसे काढता येतात. परंतु जिल्हा बॅंकेच्या किसान क्रेडीट कार्डवर अशी सुविधा उपलब्ध नाही. बॅंकवेळे व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशीही पैसे काढण्याची सुविधा बॅंकेने द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सर्व संस्थेचे अध्यक्ष, सचिव दीपक माळवदकर, भागवत मिले, शाखाधिकारी संभाजीराव माने देशमुख सर्व कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top