
District Collector releases Sakal’s Innovative Teachers supplement; teachers’ contribution celebrated.
Sakal
सातारा: ‘सकाळ’ने सातत्याने विधायक पत्रकारितेला प्राधान्य दिले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करतात. हे करत असताना ज्ञानदानाच्या व्रतात ते नावीन्यता आणतात. असे नावीन्यपूर्ण काम करून आपले वेगळेपण जपणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल ‘सकाळ’ने घेत अशा शिक्षकांची महती ‘उपक्रमशील शिक्षक’ या विशेष पुरवणीतून समाजापुढे आणली आहे. शिक्षकांनी स्वीकारलेल्या या व्रताला झळाळी देण्याचे काम या पुरवणीने केले आहे, असे मत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केले.