OBC women reservation sparks political rivalry in Kurduwadi mayoral race; alliances strategize for victory.
Sakal
सोलापूर
Kurduwadi Municipal Council: 'कुर्डुवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्षपद महिला ओबीसीमुळे वाढणार चुरस'; युती अन् आघाडीवर यश अवलंबून
Kurduwadi Municipal Council mayor election open for OBC women candidates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील व मोहिते- पाटील हे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
-विजयकुमार कन्हेरे
कुर्डुवाडी: कुर्डुवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद महिला ओबीसीसाठी राखीव झाले असून, इच्छुक जास्त असल्याने चुरस निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (२ गट), शिवसेना (२ गट), भाजप, रिपाइं (ए) या सर्व प्रमुख पक्षांसह इतर पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली असून, कोण कोणाशी युती किंवा आघाडी करणार, यावर यश अवलंबून राहणार आहे.

