
गावठाण जागेवर मालकी हक्क प्रदान करणाऱ्या 'स्वामित्व' योजनेत उल्लेखनीय कार्य करीत या कामात मध्य प्रदेशाला देशात एक नंबरवर पोचविण्याचे काम केले आहे.
अक्कलकोट (सोलापूर) : कुरनुर (ता.अक्कलकोट) चे सुपुत्र आयएएस ज्ञानेश्वर पाटील (IAS dnyaneshwar patil) हे मध्यप्रदेश येथे भुमी अभिलेख आयुक्त तसेच महसूल सचिव या पदावर कार्यरत आहे. गावठाण जागेवर मालकी हक्क प्रदान करणाऱ्या 'स्वामित्व' योजनेत उल्लेखनीय कार्य करीत या कामात मध्य प्रदेशाला देशात एक नंबरवर पोचविण्याचे काम केले आहे. (kurnool IAS dnyaneshwar patil is the land records commissioner and revenue secretary in madhya pradesh)
कुरनुर सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत पुढे जाऊन 2003 साली आयएएस बनून गावाचा झेंडा फडकविला होता आणि त्यानंतर शिवपूर व बैतुल येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. व आपला कामाचा ठसा उमटविला. त्यानंतर एक वर्ष कॅलिफोर्निया येथील बर्कले विद्यापीठात शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांची 2019 साली भूमी अभिलेख आयुक्तपदी नियुक्ती झाली असून आता त्या पदावर कार्यरत आहेत. केंद्र शासनाची गावठाण जागेवर कित्येक वर्षे राहूनही शासनाच्या विविध योजना मिळविण्यापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना स्वतःचे मालकी हक्क देणारी योजना प्रक्रिया सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशातील ही योजना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पित योजनेतून पाटील यांनी वेगाने राबविणे सुरू केले आहे. आता एकूण 1600 गावे ही स्वामित्व योजनेची पूर्ण झाली आहेत. या योजनेची वैशिष्ट्ये अशी आहेत की, गेल्या पन्नास वर्षांपासून स्वतःच्या जागेत राहत असूनही मालकी हक्क अभावी ती जागा विकू शकत नव्हते, त्यावर कर्ज घेऊन बांधकाम करू शकत नव्हते, गहाण खत करून देता येत नव्हते, त्यावर कोणताही बोजा चढवू शकत नव्हते अशा येत असलेल्या सर्व अडचणी या योजनेद्वारे दूर करण्यात आली आहेत.
या कामासाठी आयुक्त म्हणून पाटील यांनी कामाचा वेग आणि एन्ड टू एन्ड संगणकीकरण पद्धती वापरून वेगाने ही योजना पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करून विविध कल्पना वापरत सर्व अधिकारी यांच्या सहकार्याने पुढे नेत आहेत. ग्रामीण भागात अनेक कुटुंबे ही गेली कित्येक वर्षे या गावठाण जागेच्या मालकी हक्क समस्येतून जात आहेत. त्यांना ही योजना दिलासादायक ठरणार आहे. यातून गावठाण जागेवर मालकी हक्क मिळणाऱ्यांना स्वतंत्र सात बारा व नकाशे मिळणार आहेत. त्याद्वारे त्यांना इतर मालकी हक्क धारकासारखे सर्व लाभ आपल्या जागेसाठी मिळणार आहेत. त्यामुळे पाटील यांनी या योजनेस गती देत आपल्या कल्पकतेची शक्ती दाखवीत आहेत. त्यामुळे तिथल्या अशा नागरिकांना लगेच लाभास पात्र ठरविले जाण्यास मदत होणार आहे.
काय आहे एन्ड टू एन्ड संगणकीकरण
एन्ड टू एन्ड संगणकीकरणमध्ये संपूर्ण गावठाणची सर्व्हे प्रक्रिया केलेली आहे. जमिनीच्या सर्व्हेचे काम हे अतिशय किचकट, वेळ खाऊ असते. त्यामुळे अशा सर्व्हेचे काम वेळेवर पूर्ण होत नव्हते. म्हणून मध्यप्रदेशमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया संगणीकृत करून सर्व्हेचे काम आणखी सुलभ केले आहे. निवडणुकीच्या प्रक्रिया सारखीच प्रक्रिया स्थापित करून गावठाण सर्व्हेला गती दिली. हे सर्व्हेचे काम अन्य राज्ये सुद्धा मध्यप्रदेश शासानासारखे करावे म्हणून पंचायत राज मंत्रालय भारत सरकार द्वारा बेस्ट प्रॅक्टिस म्हणून सर्व राज्यांना अशा पद्धती राबवण्यासाठी निर्देशित केले आहे. अणि ही प्रक्रिया पाहण्यासाठी विविध राज्यातील महसुली अधिकाऱ्यांनी भेटी देखील दिल्या आहेत. अणि अन्य राज्यांच्या समोर सादरीकरण सुद्धा झाले आहे.
मी आणि माझे कुटुंब सुद्धा या गावठाण जागेसंबंधी त्रास भोगलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावठाण भागात राहणाऱ्या कुटुंबांना येणारी अडचण सोडविणारी ही स्वामित्व योजना असल्याने मी अधिक लक्ष घालून हे काम करीत आहे. कारण मालकी हक्कच नसेल तर त्यावर आपल्याला काहीही लाभ मिळणारच नाहीत. सदर योजना पूर्ण करताना मला खूप आनंद वाटत असून यात मला काम करता येऊ लागले आहे याचा मला अभिमान आहे.
- ज्ञानेश्वर पाटील, भु अभिलेख आयुक्त, मध्यप्रदेश
(kurnool IAS dnyaneshwar patil is the land records commissioner and revenue secretary in madhya pradesh)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.