अखेर कुरनूर धरणाने गाठली शंभरी! तीन दरवाजांतून 200 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर कुरनूर धरणाने गाठली शंभरी! तीन दरवाजांतून 200 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कुरनूर धरण (ता. अक्कलकोट) सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 100 टक्के भरले.

कुरनूर धरणाने गाठली शंभरी! तीन दरवाजांतून 200 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

अक्कलकोट (सोलापूर) : पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कुरनूर धरण (Kurnoor Dam) (ता. अक्कलकोट) (Akkalkot Taluka) सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 100 टक्के भरले असून, त्यानंतर धरणाच्या तीन दरवाजांतून 200 क्‍युसेक प्रतिसेकंद इतक्‍या वेगाने बोरी नदी (Bori River) पात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा (Prakash Baba) यांनी दिली. बोरी व हरणा नदीचा (Harna River) धरणात येणार विसर्ग अद्याप कायम असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

हेही वाचा: सोलापूर शहर होणार 'राष्ट्रवादी'मय! 5 सप्टेंबरपासून प्रभाग संवाद यात्रा

कुरनूर धरण शंभर टक्के भरल्याने अक्कलकोट तालुक्‍याचा पिण्याच्या पाण्यासह पुढील वर्षभराचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रविवारपर्यंत धरणात 55 टक्‍क्‍यांच्या आसपास पाणीसाठा होता; पण रविवारी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता धरण 100 टक्के भरले असून, पाण्याचा प्रवाह असाच कायम राहण्याची शक्‍यता आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात 45 टक्के एवढा पाणीसाठा वाढला आहे. धरण क्षेत्रातील तांदूळवाडी, मुस्ती, निलेगाव आदींसह अनेक गावांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरण एकाच दिवसात फुल्ल झाले आहे. हरणा नदीतून पाण्याचा प्रवाह जास्त असून त्यामानाने बोरी नदीला पाणी कमी येत आहे. धरण सायंकाळी 100 टक्के भरलेले असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन 200 क्‍युसेक इतक्‍या वेगाने नदी पात्रात पाणी सोडायचा निर्णय घेतला गेला आहे.

हेही वाचा: सौरऊर्जेवर चालणार आता स्प्रिंकलर! 'ऑर्किड'च्या विद्यार्थ्यांचा आविष्कार

सोमवारी रात्री होणाऱ्या पावसाने धरणात पाणी जास्त आल्यास खाली सोडण्यात येणारे पाणीही वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्‍याच्या 40 हून अधिक बोरी नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची सोय होणार आहे. यासाठी बोरी नदीवरील सांगवी, बणजगोळ, मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुद्देवाडी व बबलाद हे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे लागणार आहे. कुरनूर धरण भरल्याने अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी नगरपरिषद आणि नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. धरणाची पाणीसाठ्याची क्षमता 822 दशलक्ष घनफूट आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraviralupdate
loading image
go to top