

“Planning funds affected as Ladki Bahin scheme burden and Mahayuti’s internal confusion collide.”
-विठ्ठल सुतार
सोलापूर : महापूर व अतिवृष्टी, लाडकी बहीण योजनेस निधी द्यावा लागत असल्याचा फटका नियोजन समितीला बसला आहे. शिवाय काही जिल्ह्यात महायुतीच्या तीन पक्षातील गोंधळामुळे निधी खर्चावर परिणाम झाला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने २० हजार १६५ कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन समितीसाठी आराखडा मंजूर केला आहे. तरतूद निधीपैकी ऑक्टोबर अखेरपर्यंत ३ हजार ३५३ कोटी निधी वितरित करण्यात आले असून त्यापैकी २ हजार ३२५ कोटी निधीच खर्च झाला आहे. यामुळे उर्वरित चार महिन्यात १०० टक्के निधी मिळणार का? निधी मिळाला तर खर्च होणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.