
सोलापूर : वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने विजयालक्ष्मी नागनाथ बोगा (रा. जोडभावी पेठ) या भाऊ दशरथ कुडक्याल याच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी दिर नागनाथ भुमय्या बोगा याच्यासह पाच जणांनी काहीतरी कारण सांगून जनता बॅंकेत खाते उघडले. त्यानंतर मृत पतीचे पैसे मिळणार असल्याचे सांगून रजिस्टार कार्यालयात नेऊन स्वाक्षरी घेऊन हिश्याची जागा बळकावली, अशी फिर्याद विजयालक्ष्मी बोगा यांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे.