

Party Defection Backfires on BJP Rebels in Solapur
Sakal
सोलापूर: उमेदवारी देताना पक्षाने डावलल्याने अनेक वर्षे भाजपमध्ये असलेले व गतवेळेस नगरसेवक असलेले सहाजण अपक्ष व अन्य पक्षाकडून उमेदवारी दाखल करून महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, ते भाजपचे व त्यांचे चिन्ह कमळ ही ओळख सामान्य मतदारांत आहे. त्यामुळे आता आपले नवे चिन्ह मतदारांपर्यंत पोचवताना त्यांची दमछाक होत आहे.