Solapur Crime: 'पंढरपुरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे'; खून मारामाऱ्या खंडणी यासारख्या प्रकारांमध्ये वाढ

Crime Wave Hits Pandharpur: शहरातील वाढत्या घटनांमुळे पंढरपुरातील पोलिस करताय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. मागील एक दीड महिन्यात खून, मारामाऱ्या या सारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नव्यानेच आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या कार्यक्षमतेवर ही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Pandharpur faces rising crime incidents including murders, clashes, and extortion; authorities appeal for calm and safety.
Pandharpur faces rising crime incidents including murders, clashes, and extortion; authorities appeal for calm and safety.Sakal
Updated on

पंढरपूर : समतेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या पंढरी नगरीमध्ये आता खून, मारामाऱ्या आणि खंडणी या सारख्या गुन्हेगारी प्रकारांना उत आला आहे. दररोज घडणाऱ्या अशा घटनांमुळे पंढरपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे. अशा वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पंढरपुरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पोलिसांकडून वेळीच कडक कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे धाडस आणखी वाढत असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com