कोरोना : श्रीलंकेत कसा आहे कर्फ्यु (Video)

Learn about the Corona in Sri Lanka
Learn about the Corona in Sri Lanka

सोलापूर : श्रीलंकेतील मध्य प्रांतात गेले नऊ दिवस कर्फ्यु आहेत. तिथे अत्यंत काटेकोर नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. चार दिवसातून एकदा सहा तास खरेदीसाठी संचारबंदी शिथिल केली जात असल्याची माहिती मर्चंट नेव्हितील कॕप्टन निखिल गाडगीळ यांनी ‘सकाळ’ला दिली.
ते तिथे कामानिमित्त तिथे गेले आहेत. कोरोनाच्या थैमानाने जगाची गती मंदावली आहे. त्याला श्रीलंका अपवाद नाही. गुरुवार दुपारपर्यंत जगात कोरोनाची लागण झालेले 3 लाख 47 हजार 448 इतके रुग्ण सापडले आहेत. आत्तापर्यंत जगात 22 हजार 025 इतके रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. हा आकडा एकूण लागण झालेल्या रुग्णांच्या सुमारे 4.52 टक्के इतका आहे. या आजारातून 1 लाख 17 हजार 577 इतके रुग्ण बरे झाले

आहेत. भारतात 635 जणांना लागण झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात 45 जण आत्तापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत. श्रीलंकेत 95 जणांना कोरोनाची लागण झाली असून सात जण बरे झाले आहेत. तिथे एकाचाही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती गाडगीळ यांनी सांगितली. मर्चंट नेव्हीत कॕप्टन असलेले गाडगीळ मूळचे जळगाव असून पुण्यात स्थायिक झाले आहेत. निखील यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात झाले. ते म्हणाले की एकजणही दगावलेला नसताना श्रीलंंकेत कोरोनामुळे गेले नऊ दिवस कर्फ्यु आहे. कोलंबो, नेगंबो या दक्षिण भागात जास्त रुग्ण सापडले आहे. ही साथ अटोक्यात आल्यानंतरच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार इथून सुटका होईल. इथे आम्ही सुरक्षित आहोत. सरकार खूप चांगली काळजी घेत आहे, असे गाडगीळ यांनी नमूद केले.

अडकलो अशोकवनाजवळ 
श्रीलंकेच्या मध्य प्रांतातील धुवारा इलिया या गावात मी आहे. हे गाव  रामायणातील कथेत सीतेला रावणाने ज्या अशोक वनात आणले होते तिथून सहा किलोमीटर आहे. इथे आडकून पडल्याने ठरविले तरी तिकडे जाता येत नाही, असे कॕप्टन गाडगीळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com