पांगरी : पांढरी (ता. बार्शी) येथील साठवण तलावाजवळील वनविभागालगतच्या शेतात गुरे चारण्यासाठी सोडलेल्या वासरांवर सलग दोन दिवस बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक वासरू ठार झाले असून दुसरे वासरू गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१८) आणि शनिवारी (ता.१९) भर दिवसा घडली. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला करून जवळपास शंभर मीटर अंतरावर फरफटत नेत तलावाच्या आतील भागात नेत फडशा पाडला