शेटफळ शिवारात आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे ! वनविभागाची यंत्रणा फेल; दहशत कायम 

Leopard Search
Leopard Search

चिखलठाण (सोलापूर) : शेटफळ (ता. करमाळा) येथील शिवारात आज (ता. 12) सकाळी आठ वाजता पुन्हा बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्यामुळे या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन हे ठसे पाहिले. हे ठसे बिबट्याचे असले तरी ते तीन-चार दिवसांपूर्वीचे असावेत, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

तीन-चार दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर याच परिसरात होता. सध्या तो या ठिकाणी असण्याची शक्‍यता कमी असली तरी लोकांनी पूर्ण खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. वन विभागाची यंत्रणा या परिसरातही शोध घेत आहे. सकाळी आठ वाजता धोंडीराम मासाळ यांना शेटफळ येथील अंबादास लबडे यांच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. शेजारी शेत असणाऱ्या अतुल रोंगे यांनी याची माहिती वन विभागाला दिली. परिसरात बिबट्याच्या हल्याच्या पाच दिवसांनंतरही त्याची दहशत कायम असून, वन विभागाच्या वतीने ठोस पावले उचलण्याची मागणी लोकांमधून केली जात आहे. 

बालिकेवर हल्ल्याच्या घटनेनंतर वनविभागाच्या तावडीतून बिबट्या निसटला होता. फार मोठी यंत्रणा तैनात असतानाही व आधुनिक तंत्राचा वापर करूनही बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या वन विभागाच्या आश्वासनानंतर पाच दिवस होऊनही बिबट्याला पकडण्यात किंवा ठार मारण्यात यश मिळाले नाही. उलट मोठ्या प्रमाणावर भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. 

लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. ऊसतोडी बंद झाल्या आहेत. शेती पंपाला दिवसा वीजपुरवठा करण्याच्या नावाखाली वीजपुरवठा कालावधी कमी केल्यामुळे पाण्याअभावी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऊस तोडणी यंत्रणेचे या भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागल्याने भविष्यात सर्व ऊस गाळपाचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होणार आहे. सध्या अत्यावश्‍यक कामासाठी हातात हत्यारे घेऊनच समूहाने लोक घराबाहेर पडत आहेत. तर महिला घराबाहेर पडताना दिसत नाहीत. या परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com