पिंपळनेर : पिंपळनेर व परिसरात महिनाभरापासून बिबट्या सदृश प्राण्याने धूमाकूळ घातला आहे. डोणवाडी रस्त्यावरील पवारवस्तीवर आज (ता. १२) पहाटे तीनच्या दरम्यान उषा विलास पवार याच्या घरासमोर बांधलेल्या कालवडीवर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला. या हल्यात कालवड जागीच ठार झाली. महिना भरात हल्ला होण्याची ही १५ वी घटना असून, परिसरातील दहा ते बारा जनावरांना या प्राण्याने या ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.