बार्शीमध्ये फसवणूक झालेल्यांच्या पोलिस ठाण्यासमोर रांगा

बार्शीतील 500 हून अधिक लोकांना गंडा, पाच बॅंकेची खाती गोठवली
Money fraud
Money fraudesakal

बार्शी : बार्शी शहरासह तालुक्‍यातील नागरिक, व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्तींना दरमहा सहा ते सात टक्के जास्त रक्कम एका वर्षामध्ये देतो, असे सांगून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या विशाल अंबादास फटे याची शहरातील पाच बॅंकांमधील खाती गुरुवारी पोलिसांनी गोठवली. रात्री उशीरापर्यंत बार्शी पोलिस ठाण्यात विशाल फटे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्यांची रांग लागली होती.

Money fraud
कोल्हापूर : देशी चुना नामशेष होण्याच्या मार्गावर

पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अंबादास फटे याने अलका शेअर सर्व्हिसेस नावाची शेअर मार्केटिंग ट्रेडिंग कंपनी स्थापन केली होती. या कंपनीमार्फत गुंतवणूकदारांना शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर परतावा देण्याचे तसेच स्वतःचा दिनांक नसलेला रक्कम नोंदवून धनादेश देत असे. रविवार (ता.9)नंतर फटे याचे उपळाई रस्त्यावरील कार्यालय तसेच त्याचे दोन्ही मोबाईल क्रमांक बंद झाल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी वाट पाहिली अन्‌ सोशल मीडियावर गोंधळ सुरु झाला. त्यानंतर शेकडो गुंतवणुकदारांना आली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.सुमारे शंभरपेक्षा अधिक जणांकडून मोठी रक्कम फटे याने स्वीकारली असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. किमान पाचशेपेक्षा अधिक जणांची यात फसवणूक झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्याच्यासमवेत इतरही साथीदार असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Money fraud
कोल्हापूर : देशी चुना नामशेष होण्याच्या मार्गावर

या बॅंकेतील खाती गोठवली

पोलिसांनी फटे याचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक ऑफ इंडिया, शिवशक्ती अर्बन को-ऑप बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक अशा पाच बॅंकेमधील खाती गुरुवारी पोलिसांनी पत्र देऊन गोठवली आहेत.

साडेतीन महिन्यांपूर्वीचे केले होते दक्ष : आमदार राऊत

आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजार समिती येथे पत्रकार परिषद घेऊन तालुक्‍यातील ही दुर्दैवी घटना असून गुंतवणूकदारांना अमिष दाखविले जात आहे. यातून फसवणूक होण्याच्या शक्‍यतेचा संशय आल्याने पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांना साडेतीन महिन्यापूर्वी ही घटना फोनद्वारे कळवून दक्षता घेण्याचे सांगितले होते. याबाबत आपण मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करणार आहोत. पोलिस ठाण्यात तक्रार आली की त्वरित घ्यावी ठोस कारवाई, होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आमदार राऊत यांनी यावेळी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com