
Historic Hubli conclave: 5 Jagadgurus & 1200 Shivacharyas reaffirm Veerashaiva Lingayat Hindu identity.
Sakal
-सिद्धाराम पाटील
सोलापूर : वीरशैव आणि लिंगायत हे एकच आहेत आणि वीरशैव लिंगायत हे हिंदू आहेत, याचा पुनरुच्चार करण्यासाठी कर्नाटकातील हुबळी येथे शुक्रवारी (१९ सप्टेंबर) वीरशैव लिंगायत एकता संमेलन होत आहे. या संमेलनात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील १२०० हून अधिक शिवाचार्य आणि विरक्त मठांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. शिवाय, लिंगायतांच्या पाचही पीठांचे जगद्गुरू या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. हुबळी येथील संमेलनाच्या तयारीसाठी आज येथील अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होटगी मठात काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.