
- संतोष पाटील
टेंभुर्णी : टेंभुर्णी बसस्थानकावर चुकून उतरलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीच्या वडीलांचा शोध घेऊन टेंभुर्णी पोलीसांनी ती चिमुकली सुखरुपपणे वडीलांच्या स्वाधीन केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून टेंभुर्णी पोलीसांनी तत्परता दाखवून केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.